ताज्या घडामोडी

समाजसेवक रोहन साळवी यांच्याकडून शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम अविरत!

रायगड जिल्हा परिषद शाळा पहेल व जे.बी. सावंत हायस्कूल लोणेरे येथे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप; रोहन साळवी व मित्रपरिवाराच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक!

रोहिदास नगर / गोरेगांव ( प्रसाद गोरेगांवकर ) माणगाव तालुक्यातील प्रसिद्ध समाजसेवक तथा वंचित बहुजन आघाडीचे माणगाव तालुकाध्यक्ष रोहन अशोक साळवी यांच्या वतीने गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम अविरतपणे राबविण्यात येत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून रायगड जिल्हा परिषद शाळा पहेल आणि जे.बी. सावंत हायस्कूल लोणेरे येथील गरजू विद्यार्थ्यांना रोहन साळवी व मित्रपरिवाराच्या वतीने वह्यांचे वाटप करण्यात आले.

🎓 शिक्षणासाठी आर्थिक अडचण भासू न देण्याचा संकल्प

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य सहज उपलब्ध व्हावे आणि आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबणार नाही, या उदात्त हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला. दोन्ही शाळांमधील शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले असून रोहन साळवी यांच्या सामाजिक बांधिलकीचे जोरदार कौतुक होत आहे.

💬 “शिक्षण हीच समाज परिवर्तनाची गुरुकिल्ली!” – रोहन साळवी

यावेळी बोलताना रोहन साळवी म्हणाले की, शिक्षण हीच खरी समाज परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे. गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक ते शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे हे आपले सामाजिक कर्तव्य असून, भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल.” यापूर्वी जिल्हा परिषद शाळा उसरघर, उणेगाव यांसह माणगाव तालुक्यातील अनेक शाळांमध्ये असा उपक्रम राबवण्यात आला आहे.

🏫 मराठी शाळांचे जतन आणि शाळांना मदतीचा खंबीर पाठिंबा

सद्यस्थितीत अनेक जिल्हा परिषद मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असताना, मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या असंख्य विद्यार्थ्यांनी प्रशासन, न्यायव्यवस्था, विज्ञान, उद्योग व साहित्यात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. मराठी भाषेचे संवर्धन आणि जतन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, याच उद्देशाने रोहन साळवी व मित्रपरिवाराने केवळ साहित्य वाटपापुरते मर्यादित न राहता, शाळांमधील विविध अडचणी दूर करण्यासाठी सदैव मदतीचा हात पुढे केला आहे.

या वह्या वाटप कार्यक्रमाला प्रमुख अतिथी रोहन अशोक साळवी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल साळवी, कृषी पुरस्कारप्राप्त रोहन वसंत साळवी, पुरार उपसरपंच धीरज पवार, ‘कॉर्नर वडापाव’चे मालक नरेश टेंबे, माजी लाखपाले उपसरपंच सुरेश जाधव, व्यावसायिक विनू इंगवले, प्रेम साळवी, बबन हाटे उपस्थित होते तसेच पहेल शाळेतील शिक्षकवृंद आणि लोणेरे येथील जे.बी. सावंत हायस्कूलचे मुख्याध्यापक वसावे सर, शिक्षिका सोनगिरे मॅडम, शिक्षक गरड सर, करकरे सर, राईलकर सर, टेंबे सर, खामगावकर सर, कासारे सर आणि असंख्य विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button